RC Details Ration Card : रेशन कार्ड नंबर काढा तुमच्या मोबाईल मधून.

RC Details Ration Card : राज्यात जेव्हापासून रेशन कार्डला आधार नंबर लिंक करण्यात आले आहेत तेव्हापासून रेशन कार्डला एक विशिष्ट नंबर देण्यात आले आहेत. त्याला “RC Number” रेशन कार्ड क्रमांक असे म्हणतात. हा रेशन कार्ड नंबर तुम्हाला माहीत नसेल, तर तो कसा शोधायचा ? तुमच्या मोबाईलमधून हा नंबर कसा शोधून काढावा ? हे आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.

RC Details Ration Card Maharashtra

तुमचा रेशन कार्ड नंबर “RC Number Ration Card” पहाण्यासाठी तुम्हाला Android मोबाईलवर एक अॅप्लिकेशन इंस्टॉल करावे लागेल.

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Google Play Store ओपन करून घ्या.
  • Google Play Store च्या सर्च बार मध्ये “Mera Ration” हे केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेले मोबाईल अॅप्लिकेशन सर्च करा.
  • “Mera Ration” अॅप्लिकेशन इंस्टॉल करून ते ओपन करून घ्या.
  • “Mera Ration” हे अॅप्लिकेशन ओपन झाल्यावर होमपेजवर तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील.
  • त्या ऑप्शनमधून 7 व्या क्रमांकावरील “Aadhar Seeding” ह्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला “Ration Card No” आणि “Aadhar No” असे दोन पर्याय दिसतील. आणि खाली Submit बटन दिसेल.
  • यामधून तुम्ही “Aadhar No” हा ऑप्शन सिलेक्ट करून तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याचे आधार नंबर त्या ठिकाणी नमूद करून घ्यावे. आणि Submit बटणावर क्लिक करावे.
  • आता तुमच्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.
  • ज्यामध्ये तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत रेशन मिळत आहे, त्यानंतर Card Number दिसेल. आणि खाली रेशन कार्डवर सर्व सदस्यांची नावे आणि त्यांचे आधार क्रमांक सिडिंग आहे की नाही, ही माहिती दिसेल.

Leave a Comment