Repayment of loan : कर्जाची वेळेत आणि पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत असून राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात केवळ 132 शेतकऱ्यांच्या तक्रारींवर निर्णय न झाल्याने त्यांना लाभ मिळालेला नाही. पात्र शेतकऱ्यांना 433 कोटी 48 लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
हे वाचा : 11 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 1,554 कोटी रुपये.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 2017-18, 2018- 19 व 2019-20 या तीन वर्षांत पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केली आहे, अशांना जास्तीत जास्त रुपये 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात आला आहे.
Repayment of loan
👇 👇 👇
हे शेतकरी शिल्लक
इथे पहा
ज्या शेतकऱ्यांनी 2018-19 किंवा 2019-20 या वर्षांत घेतलेले कर्ज 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना कर्जाच्या मुद्दलाइतका प्रोत्साहनपर लाभ दिला आहे. हा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी तसेच ई-केवायसी करणे बंधनकारक केले होते.