RTE Admission : आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर.

RTE Admission : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (RTE) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर झाली आहे. प्रवेश जाहीर झालेल्या मुलांना येत्या 13 एप्रिलपासून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, शाळेत प्रवेश निश्चित करता येणार आहे.

हे वाचा : शेतात घाम गाळणाऱ्या हातांनाही सुरक्षेचे कवच.

पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर 12 एप्रिलपासून प्रवेशाचे मेसेज पाठविण्यात येणार आहे. राज्यातून पुण्यातील पोदार इंटरनॅशल स्कूलमधील 72 जागांसाठी तीन हजार 608 पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यामुळे या शाळेची लॉटरी काढण्यात आली.

RTE Admission

इथे पहा आरटीई लॉटरी

राज्यातील स्वयंअर्थसाहाय्यित, खासगी विनाअनुदानित आणि खासगी कायमविनाअनुदानित शाळांतील 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’अंतर्गत मोफत शिक्षण दिले जाते. या वर्गातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे हा यामागे उद्देश आहे.

1 thought on “RTE Admission : आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर.”

Leave a Comment