RTE Admission : ‘आरटीई’ प्रवेशाला मुहूर्त लागेना , पालकांचा जीव टांगणीला.

RTE Admission : “आरटीई’ ची प्रवेशप्रक्रिया तांत्रिक अडचणींमध्ये अडकली आहे. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश निश्चितीसाठी 25 एप्रिलची डेडलाईन देण्यात आली असून सर्व्हर हँग असल्यामुळे आपल्या मुलाचा प्रवेश होईल की नाही, ही चिंता पालकांना सतावत आहे. तथापि, सोडतीत निवड झालेल्या पाल्यांचे पोर्टलवरून निवडपत्र डाऊनलोड करायचे मग, प्रवेश पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे.

हे वाचा : या विद्यार्थ्यांना मिळणारं मोफत टॅबसोबत, इंटरनेट सुविधा.

परंतु, पोर्टल सुरु नसल्यामुळे गेल्या आठवड्यापासून पालकांना ही प्रक्रियाच करता आलेली नाही. यावर पर्याय म्हणून एका लिंकद्वारे पर्यायी व्यवस्था करण्यात आली असली, तरी त्यावरूनही अत्यंत संथ गतीने काम होत आहे. अशा परिस्थितीत दिलेल्या मुदतीमध्ये निवड यादीतील पालकांना प्रवेश निश्चित करता येणार नसल्याने, पालकांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्याचा दिलासा शिक्षण संचालनालयाने दिला आहे.

RTE Admission

तांत्रिक अडचणीमुळे पालक हैराण

25 एप्रिलची डेडलाइन
  • आरटीई’ प्रवेशासाठी निवड यादी जाहीर केल्यानंतर 12 एप्रिल रोजी पालकांना ‘एसएमएस’द्वारे त्यासंबंधी कळविण्यात आले.
  • 13 ते 25 एप्रिलदरम्यान प्रवेश पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

1 thought on “RTE Admission : ‘आरटीई’ प्रवेशाला मुहूर्त लागेना , पालकांचा जीव टांगणीला.”

  1. ज्या पालकांची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि जे पालक सरकारी नोकरदार आहेत अश्या पालकांना RTE ची सुविधा लगेच कशी मिळते आणि जे पालक आर्थिक दृष्टीने कमकुवत आहेत अश्याना मात्र उपेक्षित ठेवले आहे………

    Reply

Leave a Comment