Samruddhi Mahamarg : समृद्धीत गेलेल्या जमिनींसाठी 11 कोटी रुपये मंजूर.

Samruddhi Mahamarg : ऑरिक सिटीला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आपली जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 83 लाख 64 हजार 275 रुपये मंजूर करण्यात आले, 100 मीटर लांबीच्या या जोड रस्त्यासाठी सुमारे साडेचार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीवरील फळबागा, विहीर, घर आणि गोठ्यांसह एकरी सुमारे एक कोटी रुपये मोबदला मिळणार आहे.

एकरी किती रुपये मिळणार
इथे क्लीक करून पहा

शासनाने दिलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मोबदल्याचा दर असून ही रक्कम लवकरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. शेंद्रा औद्योगिक पट्ट्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरून समृद्धी महामार्ग जातो.

Samruddhi Mahamarg

हे वाचा : अतिवृष्टीचे 58 कोटी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

एकरी किती रुपये मिळणार
पाहण्यासाठी इथे क्लीक करा

एकरी सुमारे एक कोटी रुपये मिळणार

  • जयपूर भांबर्डा व बनगाव येथील शेतकऱ्यांच्या मालकीची सुमारे साडेचार हेक्टर जमीन भूसंपादन करून हा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • या शेतकन्यांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
  • उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या बाबत महाराष्ट्र इंडस्ट्रीयल टाऊनशिप लिमिटेडला (एमआयटीएल) सूचना दिल्या होत्या.
  • त्यानंतर एमआयटीएलने मोबदल्यासाठी 11 कोटी 83 लाख 64 हजार 275 रुपये मंजूर केले.
  • या निधीचा धनादेश एमआयटीएलने 8 फेब्रुवारी रोजी एमआयडीसीला दिला आहे.

Leave a Comment