Share Market Investment शेअर बाजारात महाराष्ट्राचे गुंतवणूक मूल्य किती ?

शेअर बाजारात (Share Market Investment) महाराष्ट्राचा वाटा 35%, दिल्ली 13%, गुजरात 12%.

भारतीय शेअर बाजार (indian share market) सेन्सेक्स आणि निफ्टीत सोमवारी सलग 5 व्या दिवशी तेजी राहिली. सेन्सेक्स २११ अंकांनी वधारून 62,504.80 अंकांच्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला. तत्पूर्वी त्याने 62,701 ची पातळीही गाठली होती. बाजारातील गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य (Market Cap) 286 लाख कोटी रुपयांच्याही वर गेले.

त्यातील 35% म्हणजे 100 लाख कोटी रुपयांचा वाटा एकट्या महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांचा (Share Market Investment) आहे. यानंतर दिल्ली 13 – 14 % आणि गुजरात 12 – 13 % यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, गेल्या 3 महिन्यांत भारतीय बाजार 9.8 % वधारले आहेत.

परकीय गुंतवणूकदारांनी काढले 1.45 लाख कोटी रुपये, भारतीयांनी 1.53 लाख कोटींचे बळ देत सावरला बाजार

महिनापरकीय गुंतवणूकभारतीया गुंतवणूक
एप्रिल-40,653+29,870
मे-54,292+50,836
जून-58,112+46,599
जुलै-6,568+10,546
ऑगस्ट+22,026-7,069
सप्टेंबर-18,308+14,120
ऑक्टोबर-489+9277
नोव्हेंबर+11,358-1,588
एकूण-145,038+152,291

मात्र, छोट्या कंपन्यांच्या शेअर्सचा संघर्ष

बदल3 महिने1 वर्ष
सेन्सेक्स9.5 %6.4 %
स्मॉल कॅप-8.2 %-9.3 %
मिड कॅप3.8 %2.6 %
लार्ज कॅप9.0 %4.5 %

आर्थिक क्षेत्रातील विश्लेषकांनुसार, भारतीय बाजार परकीय गुंतवणूकदारांसाठी पुन्हा आकर्षक ठरू लागला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे उत्तम संकेत असल्याचे मत या क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment