Sheli Palan Yojana : शेळी पालन ऑनलाईन अर्ज.

आवश्यक कागदपत्रे

Sheli Palan Yojana : कागदपत्रांमध्ये महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (Project Report). यामध्ये प्रकल्प एकूण किंमत, आवर्ती खर्च, उत्पन्न, नफा इ. बाबीचा प्रामुख्याने समावेश असणे अतिशय महत्वाचे आहे.

  • प्रकल्पाच्या जागेचे कागदपत्रे.
  • प्रकल्पाच्या जागेचे फोटो.
  • लाभधारक हिस्सा रकमेचा कागदोपत्री पुरावा.
  • अर्जदारासोबत शेळीपालकांची (Goat Farming) यादी.

अर्जदारचे वैयक्तिक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • जातीचा दाखला.
  • शिक्षणाचा दाखला.
  • उत्पन्नाचा पुरावा.
  • गेल्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट.
  • रद्द केलेला चेक.
  • प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करावयाची आहेत.

योजनेअंतर्गत शेळ्याचे पैदास प्रकल्प स्थापन करण्यासाठी अनुदान निधी मिळू शकते असे घटक म्हणजेच प्रौढ शेळ्याच्या निवाऱ्यासाठी शेड बांधकाम, पिलांच्या निवाऱ्यासाठी शेड बांधकाम, शेळ्या आणि बोकड खरेदी, पशुधनाचा वाहतूक खर्च, वैरण लागवड खर्च, चारा कुट्टी यंत्र खरेदी, मुरघास यंत्र खरेदी, प्रकल्पाकरिता आवश्यक उपकरणे तसेच विमा काढण्यासाठी होणारा खर्च आणि इतर संकीर्ण खर्च या करिता प्रामुख्याने अनुदान दिले जाते.

Sheli Palan Yojana

योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र व्यक्ति किंवा घटक

योजनेमध्ये वैयक्तिक शेतकरी, स्वयंसाह्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संस्था, शेतकरी सहकारी संस्था अर्ज करण्यासाठी पात्र आहे.

अर्ज सादर करण्याची पद्धत

  • योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी www.nlm.udyamimitra.in या वेबसाईटवरून online पद्धतीने अर्ज सादर करावा.
  • यामध्ये सर्वात प्रथम Entrepreneur म्हणून नोंदणी करावी. यामध्ये applicant details जसे की अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरावी.
  • दुसऱ्या पानामध्ये project details यामध्ये प्रकल्पाबाबतची सर्व माहिती भरावी.
  • त्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज ऑनलाइन सादर करावा.

या योजनेद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणात शेळी व्यवसाय करणारे उद्योजक निर्माण होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी, शेळी पालक, बेरोजगार युवकांनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, योजनेच्या अधिक माहिती करिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Comment