Shettale Anudan Yojana : शेततळे अनुदान योजना, लवकर अर्ज करा.

Shettale Anudan Yojana : मध्यंतरी कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेली शेततळे अनुदान योजना, कृषी विभागाच्यावतीने पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे.

शेततळ्यासाठी अनुदान किती

याचप्रमाणे शेततळ्याच्या अनुदानाच्या रक्कमेत देखील वाढ करण्यात अली आहे. शेततळ्यासाठी सामान्यता आकारमानानुसार अनुदान देय असते. असून ही रक्कम पूर्वीपेक्षा 50 टक्क्यांनी वाढविण्यात अली आहे म्हणजेच पूर्वी शेततळ्यासाठी ही रक्कम 50,000 रु. अनुदान दिले जायचे आता वाढीव रकमेनंतर शेततळ्यासाठी अनुदान 75 हजार करण्यात आलं आहे.

अर्ज कसा व कुठे करावा : येथे पहा

Shettale Anudan Yojana

मुख्यमंत्री शासन कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये शेततळ्याचा समावेश करण्यात येईल व शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करून ते 75 हजार इतका अनुदान करण्यात येईल. शासन योजनेअंतर्गत शेतकरी या घटकाची महाडीबीटी या प्रणालीद्वारे तालुकानिहाय लक्षांक ठेवून लाभार्थी निवड करण्यात येईल.

शेततळे पूर्ण झाल्यानंतर या योजनेसाठी अनुज्ञय असलेले रक्कम शेतकऱ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम पीएफएमएस (PFMS) प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येईल. अशी माहिती कृषी विभागातकडून शेतकऱ्यांना दिली जात आहे.

पात्रता

  • अर्ज शेतकऱ्यांच्या नावावर किमान 0.60 आर जमीन असावी.
  • कमाल जमिनीची मर्यादा यामध्ये देण्यात आलेले नाही.
  • शेतकरी खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक.
  • यापूर्वी अर्जदारांनी कोणत्याही योजनेअंतर्गत शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा.

अर्ज कसा व कुठे करावा ? येथे पहा

Leave a Comment