शेततळ्यासाठी अनुदान किती ?
Shettale Subsidy : पूर्वी शेततळ्यासाठी मिळणाऱ्या 50 हजाराच्या अनुदानात वाढ करून राज्य शासनाने अनुदानाची रक्कम वाढवून 75 हजार रुपये केली आहे. यामध्ये जास्तीत जास्त 34 x 34 x 3 मीटर व कमीत कमी 15 x 15 x 3 मीटर आकारमानाचे इनलेट आऊटलेटसह किंवा इनलेट आऊटलेटविरहित शेततळे घेता येईल.
Shettale Subsidy
शेततळ्यासाठी पत्रात काय ?
शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे, क्षेत्रधारणेस कमाल मर्यादा नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळ्यासाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा, तसेच अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे.
शेततळ्यासाठी अर्ज कसा करावं
अधिक माहिती https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायाखाली उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सन 2022 – 23 या आर्थिक वर्षाकरिता 13,700 वैयक्तिक शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.