Shettale Yojana Online Apply : शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करा.

मित्रांनो, शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज (Shettale Yojana Online Apply) कसा आणि कुठे करावा ? तर या संदर्भातील अधिक माहिती खालील प्रमाणे.

शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज : अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टलच्या फार्मर सेक्शनमध्ये जावे लागेल. त्यानंतर नवीन नोंदणी करून शेतकऱ्यांची मूलभूत असे माहिती भरल्यानंतर सिंचन व साधने या घटकांतर्गत शेतकऱ्यांना शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज करता येतो. शेतकऱ्यांना अर्ज करण्यास अडचणीत असल्यास जवळील सीएससी केंद्र, महा-ई-सेवा केंद्र किंवा ऑनलाईन अर्ज भरणा केंद्रावर जाऊन शेतकरी शेततळे अनुदानाचा अर्ज भरू शकतात.

Shettale Yojana Online Apply

अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. निवड झाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे शेतकऱ्यांनी पोर्टलवर अपलोड करावेत. अपलोड केल्यानंतर एक पूर्वसंमती पत्र दिले जाईल. यामध्ये अनुदानाची रक्कम नमूद असेल. त्यानंतर बिल, टेस्टरिपोर्ट, शेतकरी हमीपत्र इत्यादी कागदपत्र अपलोड केल्यानंतर कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी करण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल.

Leave a Comment