Skymet Weather : यंदा मॉन्सून उशिरा दाखल होणार, ‘स्कायमेट’ संस्थेचा अंदाज.

Skymet Weather : यंदा मॉन्सूनची गती संथ राहील. त्यामुळे मॉन्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज स्कायमेट वेदर या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. दरवर्षी 22 मे रोजी मॉन्सून दाखल असतो. परंतु यंदा मॉन्सूनची गती संथ दिसत आहे. त्यामुळे यंदा मॉन्सून अंदमानमध्ये उशिरा दाखल होईल, असं स्कायमेटने म्हंटलं आहे. तळकोकणात 7 जून रोजी तर मुंबईमध्ये 11 जून रोजी मॉन्सून दाखल होईल, असा अंदाजही स्कायमेटने वर्तवला आहे.

हे वाचा : पशु किसान क्रेडिट कार्ड वर मिळणार 4 टक्के व्याजदराने कर्ज.

दरवर्षी केरळात 1 जून रोजी नैऋत्य मॉन्सून (Monsoon Update) दाखल होत असतो. परंतु यंदा त्याबद्दल निश्चित सांगणं कठीण आहे, असं स्कायमेटनं म्हंटलं आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मॉन्सूनच्या आगमनाबद्दलची तपशील जाहीर करण्यात येतील.

Skymet Weather

स्कायमेट ही हवामान अंदाज वर्तवणारी संस्था आहे. हवामानबद्दल अंदाज देण्याचं काम ही संस्था करते. मॉन्सूनच्या दाखल (Monsoon 2023) होण्याबद्दल स्कायमेट आणि भारतीय हवामान शास्त्र विभागात गेल्यावर्षी खटके उडाले होते.

अधिक माहिती वाचा
येथे क्लिक करून

Leave a Comment