Smart Card : एसटी महामंडळाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना मागील तीन वर्षांपासून सुरु केली आहे. मात्र, तीन ते चार महिन्यांपासून स्मार्ट कार्ड देणारी यंत्रणा बंद पडली आहे.
हे वाचा : शाळेत मोफत प्रवेशासाठी अर्ज केला का ?
नवीन प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळेना झाले आहे. 31 मार्च 2023 पर्यंत स्मार्ट कार्ड काढण्याची मुदत होती. मात्र, नवीन कार्ड काढणे बंद असल्याने कार्ड कधी मिळणार असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.
Smart Card Scheme

एसटी मध्ये कोणाला किती सवलत ?
सध्या सवलतीसाठी आधार कार्डचाच आधार
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. कोरोना काळात कार्ड काढणान्यांची संख्या घटली. त्यानंतर पुन्हा वारंवार मुदतवाढ दिली जाऊ लागली आहे. आता स्मार्ट कार्ड देणारी यंत्रणाच बंद असल्याने प्रवाशांना सवलतीसाठी आधारकार्डचाच आधार घ्यावा लागत आहे.