Solar Energy : शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली सौरऊर्जा.

Solar Energy : शेतीपंपाला दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने अडीच हजार मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांना चालना दिली असून, राज्यात 543 मेगावॅट वीजनिर्मितीचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत झाले आहेत, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

हे वाचा : महाराष्ट्रातील 1.17 लाख घरकुले जाणार परराज्यात !

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. त्याअंतर्गत महावितरणने शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून, 543 मेगावॅट वीजनिर्मितीचे विविध प्रकल्प सुरू झाले आहेत.

Solar Energy

90 हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पांचा लाभ मिळत आहे. एकूण 1 हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीची कामे वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. 550 मेगावॅट वीज निर्मितीच्या प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.

याशिवाय 450 वीजनिर्मितीच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठीची आणखी एक निविदा काढण्यात आली असून, त्याची मुदत 30 जानेवारी आहे. सौर उर्जा प्रकल्प वाढले तर मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होऊ शकते.

Leave a Comment