Solar Rooftop : वीज बिल पासुन मुक्ती हवीये? घरावर बसवा सोलर पॅनल, सरकार देणार अनुदान.

Solar Rooftop : तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुम्ही विज बिल पासून सुटका मिळवू शकता. सोलर पॅनेलच्या मदतीने तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहज तयार करू शकता.

महागड्या विज बिलपासून सुटका करायची. मात्र यासाठी तुम्हाला आधी काही पैसे खर्च करावे लागतील. यानंतर तुम्हाला वीज बिलापासून मुक्ती मिळेल. सरकार ग्रीन एनर्जीलाही (Green Energy) प्रोत्साहन देत आहे आणि त्याअंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिली जाणार आहे.

Solar Rooftop Yojana

टीव्ही, फ्रीज चालवता येणार

सोलर (Solar Panel) पॅनल बसवण्यापूर्वी तुमच्या घरातील दैनंदिन विजेच्या वापराची माहिती घ्या. समजा तुम्ही 2 ते 3 पंखे, एक फ्रीज, 6 ते 8 LED लाईट्स, एक पाण्याची मोटर आणि टीव्ही चालवता. मग यासाठी तुम्हाला दररोज 6 ते 8 युनिट वीज लागेल.

अर्ज करण्यासाठी इथे क्लीक करा
सोलर पॅनेलची नवीन टेक्नोलॉजी
  • 6 ते 8 युनिट वीज तयार करण्यासाठी, तुम्हाला 2 किलोवॅटचे सोलर पॅनेल बसवावे लागतील.
  • मोनोपार्क बायफेशियल (Solar Panel) सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सोलर पॅनेल आहेत.
अनुदानाची रक्कम किती ?
  • शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला डिस्कॉम पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही कंपनीकडून तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही अनुदानासाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही रुफटॉप सोलर पॅनल तीन किलोवॅटपर्यंत बसवले तर 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल. 10 किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलवर 20 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल.

Leave a Comment