Sowing Subsidy : आत्महत्या रोखायच्या असतील तर तेलंगणाच्या धर्तीवर अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारने एकरी दहा हजार रुपये पेरणीसाठी द्यावेत, अशी शिफारस महसूल प्रशासन राज्य सरकारला करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हे वाचा : खताच्या दरात दिलासा कधी ?
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, त्यावर उपाययोजनांसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील 21 लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे पाच लाख कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. जूनअखेर सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्षासह शासनाकडे शेतकऱ्यांना दोन्ही हंगामांत एकरी १० हजार रुपये अर्थसाहाय्य करण्याची शिफारस करण्यात येणार आहे.
Sowing Subsidy
आर्थिक समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या
- आर्थिक सक्षमतेअभावी अल्पभूधारक शेतकयांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष या सव्र्व्हेतून प्रशासनाने काढला आहे. सर्व्हेत शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत थेट संवाद साधण्यात येतो.
- मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जि. प. सीईओचे पथक स्वतः शेतकऱ्याच्या घरी जाऊन सर्व्हेचा फॉर्म भरून घेतात.
