गेल्या आठवडाभरात सोयाबीनचे दर Soyabean Market Bhav
- इंदूर मार्केट : सोयाबीनचे दर (Soyabean Market Bhav) ५६९८ रूपयांवरून ५५३४ रूपयांवर आले.
- अकोला मार्केट : सोयाबीन (Soyabean Market) ५८५८ वरून ५६१८ रूपयांवर आले.
- इतर मार्केटमध्ये दर ५४०० रूपयांवरही पोहोचले होते.
परंतु या दरपातळीवत आता शंभर रूपयांची वाढ होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले. कारण शेतकरी हुशारीने माल रोखून ठेवत असल्याने बाजारात (Soyabean Market) आवक वाढत नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांची गोची झाली आहे. त्यामुळे त्यांनी वाढीव किंमतीला सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम जाणवेल.
तसेच मलेशियात पामतेलाच्या किंमतीत ३ टक्के वाढ झाली आहे. क्रुड ऑईल म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरणही थांबली आहे. सोयाबीनचे क्रशिंग केल्यानंतर सोयापेंड आणि सोयातेल ही उत्पादने तयार होतात. या उत्पादनांना जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत किती मागणी आहे, त्यांची दरपातळी काय आहे, यावर सोयाबीनचे दर ठरतात. सोयातेलाची थेट स्पर्धा पामतेलाशी असते. त्यामुळे पामतेलाचे दर वाढले की सोयाबीनला थेट फायदा होतो.
सोयापेंड निर्यातीच्या बाबतीत मात्र फारसं उत्साहाचं चित्र नाही, असं जाणकारांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी सोयापेंडच्या किंमतीत पडतळ आल्यामुळे निर्यातीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी निर्यातीसाठी करार झाले. परंतु नंतर मात्र निर्यात करारांत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे सोयाबीनला सोयापेंडीच्या आघाडीवर फारसा आधार सध्या मिळत नाहीयै. त्यामुळे सोयाबीनच्या दरातील वाढ मर्यादीत राहिल.