Free Books : पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके.

Free Books : जिल्हा परषिद, महापालिका, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. शासनाकडून जून महिन्यात पुस्तके येतील. त्यानंतर वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे पाठ्यपुस्तकांच्या महागाईची झळ संबंधित पालकांना बसणार नाही.

हे वाचा : फळपिकांसाठी घ्या हेक्टरी 46 हजार कर्ज मिळणार.!

सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य सरकारतर्फे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तके दिली जातात. प्रत्येक वर्षी पहिलीला प्रवेश निश्चित झाल्यानंतर पुस्तक संख्येचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जातो. त्यानंतर शासन पहिलीची पुस्तके पाठवते. मात्र, दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित असते. यांच्यासाठीची पुस्तके शासनाकडून जूनच्या पहिल्या आठवड्यात येतात.

Free Books

👇 👇 👇

या शाळांनाही मिळणार पुस्तके
इथे पहा

शिक्षण विभागाचे नियोजन

  • शहर आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. यंदा शाळा सुरु होण्याआधीच ही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे

Leave a Comment