Subsidy : 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी 15 हजारांचे प्रोत्साहन.

Subsidy : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. त्यासाठी 1 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना होईल.

हे वाचा : खतांच्या किमती वाढल्या, पहा खताचे नवीन दर.

या संदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. 2022 – 23 या खरीप हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर मिळेल. ही रक्कम 2 हेक्टर मर्यादित देण्यात येईल. यंदा 2022- 23 योजनेकरिता सुमारे 5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.

Subsidy

धान खरेदी 2021 – 22
  • खरीप हंगामात झाली होती. पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती. यापूर्वी खरीप हंमागात धान उत्पादकांना प्रतिक्विंटल 700 रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली.
  • मात्र ही रक्कम प्रतिक्विंटल देण्यात येत असल्यामुळे अडचणी येत होत्या. ज्यांच्याकडे 50 क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे अशांच्या नावे 50 विचटल मर्यादिपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग घडले. शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याची तक्रार होती.

Leave a Comment