Sukanya Samriddhi Yojana : भारत सरकारच्या भारतीय डाक विभागातर्फे सुकन्या समृद्धी योजनेत 10 वर्षाखालील मुलींच्या नावाने त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी धावून आली असून, सुकन्या समृद्धी योजनेचे हे प्रमुख खाते मुलीच्या जन्मापासून वयवर्षे 10 पर्यंत मुलीच्या नावाने पालकांद्वारे उघडता येते.
सुकन्या योजना कागदपत्रे
इथे क्लीक करून पहा
स्वतंत्र पासबुकची सुविधा उपलब्ध असून, ही योजना मुलीच्या भविष्यासाठी लाभदायक असल्याने लेकीच्या भविष्यासाठी ‘सुकन्या’ काढाच, असे आवाहन डाक विभागाने केले आहे. किमान 250 रुपये आणि कमाल 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम एका आर्थिक वर्षात गुंतवता येते.
Sukanya Samriddhi Yojana
हे वाचा : या वर्षी 357 लाख टन साखरेचे उत्पादन होणार.
अर्ज करण्यासाठी
इथे क्लीक करा
एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात रक्कम भरणा संख्येवर मर्यादा नाही. तसेच हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते. जुळ्या, तिळ्या मुलींच्या जन्माच्या बाबतीत दोन पेक्षा जास्त खाती उघडली जाऊ शकतात.