सर्व पिकांचे आजचे बाजार भाव । Today bajar bhav

कापूस, मका, हळद, हरभरा व सोयाबीन यांच्या किमती (Today bajar bhav) नोव्हेंबरमध्ये वाढत होत्या. मात्र सोयाबीनच्या किमती नंतर उतरू लागल्या आहेत. मक्याची मागणी वाढती आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात आवक वाढली तरी किमतीसुद्धा वाढत होत्या.

कांद्याचे दर (Today bajar bhav) मात्र घसरले. पिंपळगावमध्ये या महिन्यात कांद्याच्या किमती रु. 2650 वरून रु. 1450 वर आल्या. या पूर्वी 2011, 2016 व 2018 च्या नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती रु. 1000 पेक्षा कमी झाल्या होत्या. टोमॅटोचीही आवक वाढून किमती घसरल्या. या सप्ताहात कांद्याने रु. 1,330 ची पातळी गाठली आहे तर टोमॅटो रु. 492 वर आले आहेत.

Today bajar bhav

1 डिसेंबर पासून NCDEX मध्ये मक्यासाठी एप्रिल डिलिव्हरी व हळदीसाठी जून डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले आहेत. या सप्ताहामध्ये किमतीतील सविस्तर चढ- उतार खालील प्रमाणे आहेत.

आजचे बाजार भाव पाहण्यासाठी क्लिक करा

कापूस

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति 170 किलोची गाठी) नोव्हेंबर महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव 0.4 टक्क्याने घसरून रु. 32,960 वर आले होते; या सप्ताहात ते 0.2 टक्क्याने घसरून रु. 32,890 वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति 20 किलो) 1.7 टक्क्याने घसरून रु 1,757 वर आले आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु.6,380 व मध्यम धाग्यासाठी रु. 6,080 आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट ( छिंदवाडा ) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती प्रति क्विंटल रु. 2,200 वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या रु. 2,200 वर स्थिर आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु.2,200वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. 2,243 वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. 1,962 आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. या वर्षी खरीप मक्याचे देशातील उत्पादन उच्चांकी राहील, असा शासनाचा अंदाज आहे. परंतु मक्याची मागणीसुद्धा वाढती राहण्याचे चित्र आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment