Today Weather Maharashtra : किमान तापमानात मोठी वाढ, थंडी गायब.

किमान तापमानात (Today Weather Maharashtra) मोठी वाढ झाल्याने राज्यातील थंडी गायब झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड आणि धुळे वगळता उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा 16 अंशांच्या वर सरकला आहे. आज राज्यात कोरड्या हवामानासह, तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान (Today Weather Maharashtra) विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्येही किमान तापमानात चढ-उतार होत आहे. राजस्थानातील चूरू येथे रविवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत निचांकी 5.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र थंडी ओसरली आहे. दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. आकाश अंशतः ढगाळ होऊन, उकाडाही अनुभवायला मिळत आहे.

Today Weather Maharashtra

रविवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील 9.6 तापमान नोंदविले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालयात 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल 34 अंश तापमान नोंदले गेले. राज्यात किमान तापमानात चढ – उतार सुरू आहे. बहुतांश ठिकाणी पारा 16 ते 24 अंशांच्या दरम्यान होता. तर कमाल तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

कमी दाब क्षेत्र होणार तीव्र

बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात आजपर्यंत कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत ही प्रणाली तीव्र होईल. हे दाब क्षेत्र गुरूवारी सकाळपर्यंत उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर पोचण्याचे संकेत आहेत.

राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :

  • पुणे 31.1 (18.4),
  • जळगाव 31.7 (17.6),
  • धुळे 31(10.4),
  • कोल्हापूर 31.3 (21.7),
  • महाबळेश्वर 25.4 (17.1),
  • नाशिक 31.9 (20.6),
  • निफाड 30.4 (9.6),
  • सांगली 31.9 (20.6),
  • सातारा 30.1 ( 21.8),
  • सोलापूर 33.2 (21.3),
  • सांताक्रूझ 33.5 (18.8),
  • डहाणू 30.5 (20.3),
  • रत्नागिरी 34.0 (23.5),
  • औरंगाबाद 30.2 (16.4),
  • नांदेड 32.3 (20.8),
  • उस्मानाबाद 31.3(17.4),
  • परभणी 30.9 (20.2),
  • अकोला 32.7 (18.0,
  • अमरावती 32.4 (16.3),
  • बुलडाणा 30.4 (19.0),
  • ब्रह्मपूरी 32.1 (16.2),
  • चंद्रपूर 28.8 (17.8),
  • गडचिरोली 31.3 (13.0),
  • गोंदिया 29.0 (13.5),
  • नागपूर 30.5(15.4),
  • वर्धा 30.9(16.4),
  • यवतमाळ 31.0(16.5).

Leave a Comment