Tractor Loan : अण्णासाहेब महामंडळाची ट्रॅक्टर कर्ज योजना पुन्हा होणार सुरू

Tractor Loan : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून ट्रॅक्टर कर्जाचा व्याज परतावा देण्यात येणार असून योजना राज्यात पुन्हा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळाच्याअ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा अंतर्गत ट्रॅक्टरवरील कर्ज व्याज परतावा बंद करण्यात आला होता. तो पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हे वाचा : युरिया, डीएपी खता बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय.

“तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ट्रॅक्टर कर्जाचा परतावा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. महामंडळाची 77 वी संचालक मंडळाची बैठक 26 एप्रिल झाली. बंद केलेला कर्ज व्याज परतावा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” पुढे पाटील म्हणाले, “महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र तयार करण्यापूर्वी अनेक लाभार्थीनया बँकेमार्फत कर्ज मंजूर करण्यात आले होते.

Tractor Loan

अर्थसंकल्पीय निधी किती
इथे पहा

बँकेसोबत करार
  • बँक ऑफ इंडियासोबत महामंडळाने पाच जिल्ह्यात करार केला असून उर्वरित जिल्ह्यातही करार करण्यात येणार आहेत. लहान व्यवसाय करणाऱ्या लाभार्थीना लघु कर्ज योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment