Traffic Rules : वाहतूक नियम आणि त्याअनुषंगाने असणारे थोडेफार फायदे चालकांना माहिती असतात. पण, मोटर वाहन कायद्यात असे काही नियम आहेत की जे बहुतांश चालकांना माहितीच नाहीत. वाहतूक पोलिसांकडून (Traffic police) याच नियमानुसार अनेक चालकांना दंड करण्यात येतो आणि दंडाचे कारण ऐकल्यानंतर चालकही अवाक होतो.
हे वाचा : राज्यात या ठिकाणी पुन्हा विजांसह पावसाचा अंदाज.
दररोज वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या कलमांखाली वाहनांवर कारवाई केली जाते. या कारवाईतून हजारो रुपयांचा दंडही वसूल केला जातो. कारवाई केलेल्या एकूण वाहनांपैकी दुचाकींवर झालेल्या कारवाईचे प्रमाण जास्त असते. वाहनाला आरसा नसणे, सायंकाळी दिवे न लावणे, मडगार्ड नसणे, लाल रिफ्लेक्टर नसणे, सायलेन्सर काढून ठेवणे किंवा ते मॉडिफाय करणे आदी नियम भंगासाठीही अनेक चालकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो.
Traffic Rules
नियम मोडल्यास किती रुपये दंड
या कारणानेही होऊ शकते कारवाई
- वाहनाचा कर्कश आवाज.
- मोठ्या आवाजाचे हॉर्न.
- अस्पष्ट नंबर प्लेट.
- सूर्यास्तानंतर लाईट न लावणे.
- वाहनाला मडगार्ड नसणे.
- पार्किंग लाइट न लावणे.
- लाल रिफ्लेक्टर नसणे.
- वाहनाला आरसा नसणे.
- सायलेन्सर काढून ठेवणे.