देशातील बाजारात सध्या सोयाबीन (Soybean) आणि कापसाच्या (Cotton rate) दरात नरमाई आली आहे. त्यातच शेतकऱ्यांची तूर बाजारात दाखल झाली आहे. शेतकऱ्यांना तुरीला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या नव्या तुरीची हळूहळू वाढत आहे. तर दुसरीकडे आयातही जोमात सुरु आहे. तरीही तुरीचे दर बाजारात (Tur Market Bhav Today) टिकून आहेत.
तसेच पुढील काळातही तुरीला चांगाल दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. देशात मागील यंदा तुरीची लागवड कमी झाली. त्यातच पावसाने तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे यंदा देशातील तुरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये तुरीची आवक सुरु झाली.
Tur Market Bhav Today
मात्र काही भागांमध्ये लागवड उशीरा झाल्याने तूर काढणीही उशीरा होत आहे. महाराष्ट्रात अनेक भागांमद्ये तूर अद्यापही दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे ही तूर जानेवारीच्या मध्यानंतर बाजारात दाखल होऊ शकते, असा अंदाज आहे. मात्र सध्या देशात तुरीची उपलब्धता कमी असल्याने दरातील तेजी कायम आहे. भाराताने आफ्रिका आणि म्यानमारमधून मोठी खरेदी केली. त्यामुळे या देशांमध्ये तुरीची उपलब्धता कमी झाली आहे.
तुरीचे आजचे बाजर भाव
त्यातच आयात तूर खरेदीत सरकारही उतरले आहे. त्यामुळे आयात तूर खेरदीत स्पर्धा आहे. स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा जास्त किंमत देऊन आयात माल खरेदी करत आहेत. परिणामी सरकारला आयात तूर कमी प्रमाणात मिळत आहे. सध्या देशातील बाजारात नव्या तुरीची आवक होत आहे. मात्र आवकेचे प्रमाण कमी आहे.
नव्या मालात सध्या १४ ते १७ टक्क्यांपर्यंत ओलावा येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र या तुरीलाही सध्या चांगला दर मिळत आहे. तुरीचा बाजारात मर्यादीत पुरवठा आहे. त्यातच बऱ्याच भागातील माल उशीरा बाजारात होणार आहे. त्यामुळे बाजार टिकून राहू शकतो.