Tur Market Bhav : तुरीचे आजचे भाव.

सध्याची दरपातळी

सध्या देशातील बाजारात नव्या तुरीला प्रतिक्विंटल (Tur Market Bhav) सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळत आहे. तर जुन्या मालाचा बाजारभाव ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. यंदा देशात तुरीचा पुरवठा मर्यादीतच राहण्याचा अंदाज आहे. तर मागणी मात्र कामय राहील. त्यामुळे तुरीचे दर तेजीत राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

दर टिकेल का ?

सरकारने मागील हंगामात विक्रमी तूर आयात (Tur Market Bhav) केली होती. यंदा सरकारने त्याचप्रमाणात आयात केली तरी देशातील मागणीपेक्षा पुरवठा कमी राहील, असा अंदाज आहे. कारण देशातील तूर उत्पादनातील घट ही सरकारच्या अंदजापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुरीला यंदा सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने तुरीची विक्री करावी, असे आवाहन तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.