Tur Market Rate Today : तुरीला सध्या पांढऱ्या सोन्याचा (कापूस) भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, मात्र आतापर्यंत 90 टक्के शेतकऱ्यांनी तूर विकून टाकली आहे. या भाववाढीचा फायदा फक्त 10 टक्केच शेतकऱ्यांना मिळणार आहे.
हे वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला घरगुती गॅस दरवाढीचा चटका.
ज्यांनी भाववाढीच्या अंदाजाने तूर घरातच ठेवली होती. कापसालाही सध्या 7 हजार 500 ते 8 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर विक्रीला काढली आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी तूर विकून टाकली आहे. तुरीपाठोपाठ डाळीचे भावही कडाडले. यामुळे वार्षिक डाळ खरेदी करणाऱ्यांना खिसा सैल ठेवावा लागणार आहे.
Tur Market Rate Today

कोणत्या बाजार समितीत तुरीला काय भाव ?
आणखी भाव वाढतील ?
मागील आठवड्यात तुरीच्या दरात क्विंटलमागे 650 ते 2 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली. 7 हजार 500 ते 8 हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव जाऊन पोहोचला. तुरीची आयात झाली नाही व शेतकऱ्यांकडील आवक वाढली नाही तर तुरीच्या भावात आणखी वाढ होईल.