UREA DAP Buffer Stock : युरिया, डीएपी बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय.

UREA DAP Buffer Stock : येत्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खताचा तुटवडा होऊ नये याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्याच्यामुळे राज्यामध्ये 0.50 लाख मॅट्रिक टन युरिया (UREA) आणि 0.25 लाख मॅट्रिक्ट टन DAP खताचा (Buffer Stock) अर्थात संरक्षित साठा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे.

हे वाचा : फळपिकांसाठी घ्या हेक्टरी 46 हजार कर्ज मिळणार.!

राज्यामध्ये खरीप हंगामात जून, जुलै व ऑगस्ट या कालावधीतमध्ये शेतकऱ्याकडून खताची मोठ्या प्रमाणत मागणी केली जाते. परंतु राज्यामध्ये या कालावधीत मान्सून सक्रिय असल्याने याचा परिणाम खताच्या वाहतुकीवरती होतो. या सर्वांच्या पार्श्वभूमी वरती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा खताचा संरक्षित साठा केल्यास त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ती खत उपलब्ध होतात. याच पार्श्वभूमी हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

UREA DAP Buffer Stock

शासन निर्णय (GR)
येथे पहा

खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे व वेळेवर युरिया व डीएपी खतांचा पुरवठा करण्यासाठी युरिया 0.50 लाख मेट्रिक टन आणि डीएपी 0.25 लाख मेट्रिक टन खताचा संरक्षित साठा (Buffer Stock) या खालील कंपन्यांना देण्यात आला आहे.

महामंडळाचे नवायुरिया
(50000 मे. टन)
डीएपी
( 25000 मे. टन)
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, मुंबई (70%)35000 मे. टन17500 मे. टन
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटींग फेडरेशन, मुंबई (20%)10000 मे. टन5000 मे. टन
दि विदर्भ को-ऑप. मार्केटींग फेडरेशन, नागपूर (10%)5000 मे. टन2500 मे.टन
Buffer Stock

Leave a Comment