Vihir Yojana
आवश्यक कागदपत्रे
- सातबारा उतारा
- 8-अ चा उतारा
- मनरेगा जॉब कार्ड
अर्ज कुठे व कसा करायचा ?
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी सध्या तरी ग्रामपंचायतीकडे अर्ज (vihir yojana online form) करता येईल. हा अर्ज ऑनलाईन भरण्याचं काम ग्रामपंचायत करेल. शेतकऱ्यानं ग्रामपंचायत कडून पोच पावती घ्यावी. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सुरू झाल्यानंतर शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला संमतीपत्र देणे आवश्यक आहे. विहिरीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीत विहीर (Vihir Yojana) पूर्ण करण्याचा कालावधी 2 वर्षांचा आहे. अपवादात्मक परिस्थिती (दुष्काळ, पूर, इ.) विहीर पूर्ण करण्याचा कालावधी जास्तीत जास्त 3 वर्षां पर्यंत राहिल.