Weather Forecast In Maharashtra : राज्यात उद्यापासुन पावसाचा अंदाज.

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) निर्माण झाले आहे. राज्यात पावसाला (Rainfall) पोषक हवामान तयार होत असून, उद्यापासून काही ठिकाणी पावसाचा अंदाज (Rain Forecast) हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील थंडी गायब झाली आहे. राज्याच्या तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज (Weather Forecast In Maharashtra) देखील वर्तविण्यात आला आहे.

येथे क्लिक करून पहा : कोणत्या ठिकाणी पाऊस पडणारं

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा वाढू लागला आहे. राजस्थानातील चुरू येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी 3.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र थंडी नाहीशी झाली आहे. दिवसा ढगाळ हवामानासह उकाडा चांगलाच वाढू लागला आहे.

Weather Forecast In Maharashtra

बुधवारी गडचिरोली येथे राज्यातील नीचांकी 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल 35.5 अंश तापमान नोंदले गेले. उपसागरातील वादळी प्रणालीमुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ढगाळ वातावरण आहे. उद्यापासून कोकण, तर शनिवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर रविवारपासून विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

येथे क्लिक करून पहा कोणत्या ठिकाणी पाऊस पडणारं

Leave a Comment