Weather Report : राज्यात कमाल तापमानात वाढीची शक्यता.

Weather Report : राज्यात उन्हाचा पारा चढतच असून, याता आता आणखी भर पडणार आहे. कारण, हवामानात होत असलेल्या बदलामुळे महाराष्ट्र, तेलंगणाच्या बहुतांश भागात, गुजरात, छत्तीसगड, रायलसीमा अनेक भागांवर, ओडिशाअंतर्गत काही भागांसह तामिळनाडू, केरळ येथे कमाल तापमानाची नोंद 35 ते 37 सेल्सिअसच्या आसपास होत असून, पुढील दोन दिवसांत राज्यात अंतर्गत भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंशाची भर पडणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील तापमान
पाहण्यासाठी इथे क्लीक करा

त्यामुळे महाराष्ट्र उन्हाने होरपळून निघणार आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह लगतच्या भागात कमाल तापमानात कमालीची वाढ होत आहे. थंडीने तर राज्यातून केव्हाच माघार घेतली असली तरी राज्यातील काही ठिकाणी रात्री गारवा आणि दिवसा उन्हाचा तडाखा, असे वातावरण आहे. मुंबईचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून इथल्या प्रदूषणाने कहर केला असतानाच दुपारी बारा ते दोनदरम्यान पडणारे ऊन अक्षरश: चटके देत आहे.

Weather Report

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईकरांना उन्हाचे चटके बसत असून, हवामानातील बदलामुळे मुंबईकर व्हायरल फिव्हरने हैराण झाले आहेत. गुजरातकडून येणारे वारे, पूर्वेकडून वाहणारे वारे समुद्राहून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला अटकाव करत आहेत.

हे वाचा : 17 हजार जणांना ‘प्रोत्साहन अनुदान ‘.

त्यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानाची नोंद आता ३५ अंशाच्या आसपास होत असली तरी होळीनंतर यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment