Weather Today : अरबी समुद्रावरून (Arabian Sea) होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाले असल्याने आज काही ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Forecast) वर्तविण्यात येत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा देखील कमी झाला आहे.
हे वाचा : Cold Weather : राज्यात थंडी कमी होणार.
नैॡत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नैॡत्य उत्तर प्रदेशापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
Weather Today
यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. यातच उत्तर अंतर्गत तमिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे.
आज कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील नीचांकी 9.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालयात 9.6 अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या इतर भागात किमान तापमानात वाढ झाली आहे.
राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, किमान तापमान :
कमाल तापमान | किमान तापमान | |
पुणे | 31.2 | 12.6 |
जळगाव | 30.7 | 12.8 |
धुळे | 28 | 9.6 |
कोल्हापूर | 30.2 | 17.7 |
महाबळेश्वर | 25.1 | 14.4 |
नाशिक | 28.5 | 11 |
निफाड | 29 | 9.5 |
सांगली | 29.7 | 16.7 |
सातारा | 30.5 | 14.5 |