Sesame Cultivation   तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे

महाराष्ट्रात तिळाचे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते.

तिळाच्या बियाण्यात सर्वसाधारणपणे तेलाचे प्रमाण ५० टक्के, तर प्रथिने २५ टक्क्यांपर्यंत असतात.

मध्यम ते भारी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

तिळाचे बी बारीक असते, तर सुरुवातीची वाढ हळू होते म्हणून जमीन भुसभुशीत करून घट्ट दाबून घ्यावी.

उन्हाळी तिळासाठी फुले पूर्णा, ए.के.टी.- १०१ या वाणांची लागवड करावी.

तीळ पेरणीसाठी २.५ ते ३.० किलो प्रति हेक्टर उत्तम प्रतिचे बियाणे वापरावे. 

उन्हाळी तीळ पिकाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान करावी.

पेरणीनंतर ८-१० दिवसांनी पहिली विरळणी, तर दुसरी १५-२० दिवसांनी करावी.

सुधारित लागवड तंत्राचा वापर केल्यास उन्हाळी तिळापासून ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.