Wheat Crop : मागील काही महिन्यांपासून गव्हाच्या दरात तेजी आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांतच गव्हाला 2500 ते 2800 रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. आता यंदाच्या हंगामातील गहू विक्रीला येत असून, बाजार समित्यांत गव्हाच्या (Wheat Rate) दरातील तेजी टिकून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानामुळे बसलेल्या आर्थिक झळीची भरपाई करता येऊ शकणार आहे.
हे वाचा : अकरा हजार शेतकऱ्यानं अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी.
सध्या बाजारात गव्हाच्या दराबाबत उलथापालथ सुरू आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धादरम्यान गव्हाची विदेशी मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. मागणी जास्त असल्याने बाजारात गव्हाची चांगली पकड असून गव्हाच्या दरात वाढ होत आहे.
Wheat Crop In India

बाजार समित्यांतील गव्हाचे दर
पाहण्यासाठी इथे क्लीक करा
बाजारातील तज्ज्ञांच्या मते गव्हाचे दर वाढू शकतात. आगामी काळात गव्हाचे भाव 3 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. गव्हाच्या दरात अशीच वाढ होत राहिल्यास आगामी काळात गव्हाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. प्रत्यक्षात आगामी काळात बाजार समित्यात गव्हाची आवक वाढल्यानंतर दर कमी होतात की वाढतात तेच स्पष्ट होणार आहे.