बाजार समित्यांतील गव्हाचे दर (Wheat Rate Today)
बाजार समिती | गव्हाचे कमाल दर |
कारंजा | 2800 |
मंगरूळ | 2700 |
वाशिम | 2620 |
मानोरा | 2650 |
रिसोड | 2700 |
नवा गहू आल्यावर दर पडणार तर नाही ना
सद्यस्थितीत देशात गव्हाचा तूटवडा निर्माण झाल्याने दर तेजीत आहेत,परंतु सद्यस्थितीत नवा गहू (Wheat Crop) बाजारात दाखल झालेला नाही. नवा माल बाजारात आला की, दर पडतात, असा ठोकताळा आहे. त्यामुळे पुढील महिन्यात नव्या गव्हाची बाजारात आवक वाढल्यास दर पडणार तर नाही ना, अशी शंकाही शेतकरी उपस्थित करीत आहेत.
प्रमुख उत्पादक असलेल्या राज्यातच टंचाई
- देशातील सर्वात मोठं गहू उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये गव्हाची चंटाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तिथे गव्हाच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच बिहारमध्ये देखील गव्हाच्या किमतीत वाढ झाली आहे.
- इतर राज्यांच्या तुलने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रात आणि पर्यायाने जिल्ह्यातही दिसू शकेल.